एका वर्षात 10 लाख झाडे लावण्याचा संकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षानुवर्षे सीग्रामचे 100 पायपर्स ‘प्ले फॉर ए कॉज’ व्यासपीठ हे समाजावर सकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या कार्यांना पाठिंबा देण्यामध्ये अग्रस्थानी राहिले आहे. यंदा 100 पायपर्स ‘प्ले फॉर ए कॉज’ आरोह फाऊंडेशनसोबत एका वर्षात 10 लाख वृक्षांचे रोपण करणार आहेत. 100 पायपर्सने 22 एप्रिल वसुंधरा दिनी ही महत्त्वपूर्ण मोहीम सुरू केली. ‘पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण’ या थीमभोवती 13 प्रतिष्ठत एनएफटी डिझाइन्स खरेदीसाठी https://gagen.com/100pipers या व्यासपीठावर लाँच केल्या आहेत. लाँच केल्याच्या 10 मिनिटांमध्येच सर्व 13 एनएफटींची विक्री झाली. एनएफटी विक्रीमधून प्राप्त उत्पन्न आरोह फाऊंडेशनला दान करण्यात येईल आणि यामुळे मोठय़ा वृक्षारोपण उपक्रमाप्रती योगदान देण्यास मदत होईल. ब्रॅण्डने वृक्षारोपणाच्या गरजेबाबत जागरूकता अधिक वाढवण्याकरिता अद्वितीय डिजिटल मोहीमदेखील लाँच केली असून त्यामध्ये सहभागी होण्याचे रिकार्ड इंडियाचे प्रमुख विपणन अधिकारी कार्तिक मोहिंद्रा यांनी केले आहे.