परळच्या कृष्णानगर इमारत संघाने पटकावला मोहन रावले चषक, सिमेंट चाळ संघ उपविजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडाप्रेमी, दिवंगत शिवसेना माजी खासदार मोहन रावले यांच्या स्मरणार्थ परळमध्ये आयोजित मोहन रावले स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत परळच्या कृष्णानगर इमारत संघाने सिमेंट चाळ, परळ संघाचा चुरशीच्या अंतिम लढतीत पराभव करीत विजेतेपद पटकावले. या मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत विभागातील नामवंत क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेला स्थानिक क्रिकेट शौकिनांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण कांचन मोहन रावले व शिवसेना उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. स्पर्धेला शिवसेनेच्या ‘फायर’ आजीबाई चंद्रभागा शिंदे यांच्यासह  शिवसेना उपविभागप्रमुख पराग चव्हाण, किशोर वांजळे, भारत म्हाडगुत, रमेश सावंत व आयोजक मिनार नाटळकर यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेला शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना खासदार उपनेते अरविंद सावंत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार अजय चौधरी, आमदार यामिनी जाधव, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष जगदीश सावंत, नितीन नांदगावकर, विभागातील सर्व नगरसेवक, शाखाप्रमुखांनी भेट दिली.