चंद्र पृथ्वीवरील पाणी खेचून घेतोय, संशोधकांचा नवीन शोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

चांद्रयान ही चंद्रावरील पाण्याचा शोध घेणारी भारताची पहिली मोहीम होती. आता चंद्रावर परत जाण्याची योजना करत असताना संशोधक चंद्राच्या पृष्ठभागाचे सर्वेक्षण करत आहेत. भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे यश म्हणजे 2008 मध्ये चंद्रावरील पाण्याचा शोध. पहिल्या शोधानंतर सुमारे 14 वर्षांनी, हे पाणी कोठून आले हे आता संशोधकांना समजले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का फेअरबँक्स जिओफिजिकल इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांच्या एका नवीन अभ्यासानुसार चंद्रावरील पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आयन पृथ्वीच्या वरच्या वातावरणातून बाहेर पडून चंद्रावर एकत्रित झाल्यामुळे तेथे तयार झाले असू शकते.

चंद्राच्या वायुविहीन जागेवर पाण्याचा साठा शोधणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यूएस, युरोप आणि चीनमधील अंतराळवीरांनी पृष्ठभागावर येण्याची आणि मंगळाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी एक योजना आखली आहे. नासाच्या आर्टेमिस टीमने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बेस कॅम्प बनवण्याची योजना आखली आहे. नवीन संशोधनानुसार चंद्र पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडलेल्या आयनांपासून तयार केलेले सुमारे 3,500 क्यूबिक किलोमीटर पर्माफ्रॉस्ट किंवा भूपृष्ठावरील पाणी खेचत असेल. पृथ्वीतून बाहेर पडणारे 1 टक्के आयन चंद्रापर्यंत पोहोचत असल्याचे लक्षात घेऊन हा अंदाज बांधण्यात आला आहे.

संशोधनानुसार हायड्रोजन आणि ऑक्सिजन आयन चंद्रावर जातात तेव्हा ते चंद्राभोवती फिरतात. नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांच्या अभ्यासात चंद्राच्या संक्रमणादरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी तयार करणारे आयन आढळले आहेत. या निष्कर्षामुळे चंद्रावरील या कायमस्वरूपी गोठलेल्या प्रदेशामध्ये भविष्यातील संशोधनाचा मार्ग मोकळा होईल जे चंद्राच्या पृष्ठभागावरील पाण्याचे विशाल साठे बाहेर काढू शकतील.