
महिला पोलिसाला धक्का मारून धूम ठोकणाऱ्या मनसेच्या संदीप देशपांडे व संतोष धुरी यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. न्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे देशपांडे व धुरी यांना सत्र न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळू शकलेला नसून देशपांडेंच्या जामीन अर्जावर 17 मे रोजी सुनावणी होणार आहे.
अटक टाळण्यासाठी दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार होती, मात्र न्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी देशपांडे यांच्या चालकाला व आणखी एकाला अटक केली आहे.

























































