इंद्राणी मुखर्जी साडेसहा वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शीना बोरा हत्या प्रकरणात सहा वर्षे नऊ महिने तुरुंगात राहिल्यानंतर इंद्राणी मुखर्जी हिची आज तुरुंगातून सुटका करण्यात आली. आज सायंकाळी ती भायखळा महिला तुरुंगातून बाहेर पडली. सर्वोच्च न्यायालयाने इंद्राणी या प्रकरणात बुधवारी जामीन मंजूर केला होता. दोन लाख रुपयांच्या रोख बॉण्डवर तिला जामीन मंजूर करण्यात आला. इंद्राणी ही आलिशान कारमधून भायखळा तुरुंगातून बाहेर पडली. तुरुंगाबाहेर तिचे वकील उपस्थित होते. इंद्राणी तुरुंगाबाहेर येताच प्रसारमाध्यमांनी तिच्या कारला गराडा घातला. त्यांना केवळ हसून प्रतिसाद देत ती निघून गेली.