बस लोकेशन पाहणाऱया विद्यार्थिनीचा मोबाईल हिसकावून नेला; दोघा चोरांना भिवंडीत पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बस लोकेशन बघत उभ्या असलेल्या तरुणीच्या हातातला मोबाईलच दुचाकीवरून आलेल्या चोरटय़ांनी हिसकावून नेला. पण मुलुंडच्या नवघर पोलिसांनी कसून शोध घेत त्या चोरांना भिवंडीत जाऊन बेडय़ा ठोकल्या. त्यांनी गुह्यात वापरलेली ठाण्यातील चोरीची दुचाकी हस्तगत केली.

मुलुंडच्या म्हाडा कॉलनीत राहणारी पारुल बडगुजर (19) मुक्ती टॉवर येथील बस स्टॉपवर बसचे लोकेशन बघत उभी होती. तेवढय़ात दुचाकीवरून आलेल्या आस्वाद शेख (19) आणि अरबाज अन्सारी (20) या दोघा चोरांनी पारुलच्या हातातला मोबाईल हिसकावून पळ काढला. पारुलने याबाबत नवघर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ताजीराव पवार व पथकाने चोरांचा तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याबरोबर खबऱयांना कामाला लावण्यात आले.