ऐकावं ते नवलच! एकाच वेळी तीन हेलिकॉप्टर ओढत केला विश्वविक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकांना काहीतरी जगावेगळं करण्याचा छंद असतो. या छंदातूनच ते विक्रम घडवत असतात. अशीच एक घटना रशियात घडली आहे. रशियन हल्क म्हणून प्रसिद्ध असणाऱया सर्गेई अगडजानयान याने 19 मे रोजी एकाच वेळी  तीन हेलिकॉप्टर ओढण्याचा विश्वविक्रम केला. यापूर्वीही त्याने असे अनेक कारनामे केलेले आहेत. सर्गेईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, सर्गेई हेलिकॉप्टर ओढताना  एक गरम पाण्याची पिशवी तोंडाने हवा भरून फुगवतो.

दोन अन्सॅट हेलिकॉप्टर आणि एक एमआय-8 हेलिकॉप्टरचे एकूण वजन 15.6 टन होते. सर्गेईने अवघ्या 24.63 सेकंदात हे तिन्ही हेलिकॉप्टर 4.3 मीटर अंतरापर्यंत ओढले. पावसामुळे रस्ता ओलसर झाला होता,अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर ओढण्यासाठी सर्गेईला तीन प्रयत्न करावे लागले. पहिले दोन प्रयत्न अपयशी ठरले, पण तिसऱया प्रयत्नात त्याने विश्वविक्रम केला.  हा विक्रम आतापर्यंत  रशियाच्या फेडरेशन ऑफ पॉवर एक्स्ट्रीमचे अध्यक्ष वासिली ग्रिशचेंको यांच्या नावे होता.