
गांजा तस्करी करण्यासाठी आलेल्या दोघा तस्कारांना गुन्हे शाखेच्या युनीट सहाने अटक केली. त्यांच्याकडून साडेचार लाख रूपयांचा 22 किलो गांजा आणि मोटार असा मिळून 8 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई लोणीकंद परिसरात करण्यात आली आहे.
हनुमंत भाऊसाहेब कदम (रा. कुसडगाव, ता. जामखेड. जि. नगर) आणि तुषार संजय झांबरे (रा. टाकळसिंग. ता. आष्टी. जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने पथकासह हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मोटारीतून गांजा तस्करीसाठी दोघेजण येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. परिसरात संशयित मोटार चालक दिसताच पोलीसांनी त्याला अडविले. त्यांच्याकडे 22 किलो गांजा मिळून आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक गणेश माने, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांनी केली.

























































