Instagram Outage – हिंदुस्थानात इन्स्टाग्राम झालेले डाऊन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील अनेक भागांमध्ये बुधवारी सकाळी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लॉगइन करण्यास अडचण येत असल्याने बुधवारी सकाळी 9.45 वाजल्यापासून ते दुपारी 12.45 पर्यंत या कालावधीत तब्बल 3,226 तक्रारी दाखल झाल्या. मात्र इन्स्टाग्राम डाऊन असल्याबद्दल ‘मेटा’कडून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.