
गोठवलेले बँक खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या राज्यकर निरीक्षक वर्ग दोन महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
जोत्स्ना रामचंद्र कोरडे (35) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराचे बँक खाते गोठविण्यात आले होते. त्यासाठी क्लिअरन्स सर्टिफिकेट देण्यासाठी जोत्स्ना यांनी दोन हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने राज्यकर निरीक्षक कोरडे यांना रंगेहात पकडले आहे.




























































