
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील ढासला येथे घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या- चांदीचे दागिन्यांसह नगदी रोख रक्कमेसह पाच लाखाचे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह नगदी मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे ढासला गावासह परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी दरोडेखोरांना विरोधात बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंटेवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला आहे. बदनापूर तालुक्यातील ढासला येथील फिर्यादी शेतकरी राम शाम पाटील यांचे घर अज्ञात 13 ते 14 जूनच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश केला.
त्यांनी कपाटात व लोखंडी पेटीत ठेवलेले 1 लाख 50 हजार रुपये ज्यामध्ये 500 रुपये दराच्या नोटा असलेले दोन बंडल 100 रुपये दराच्या नोटा असलेले 3 बंडल व 500 रुपये दराचे नोटा असलेले 20 हजार रुपये, सोन्या चांदीचे दागिने, 2 लाख 75 हजार रुपये ज्यामध्ये 4 सोन्याच्या अंगठ्या प्रत्येकी 3 ग्रॅमच्या व एक अंगठी 5 ग्रॅम वजनाची, 30 हजार रुपये ज्यामध्ये 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 75 हजार रुपये ज्यामध्ये दीड तोळ्याची सोन्याची एकदानी, 40 हजार ज्यामध्ये 9 ग्रॅम वजनाची सोन्याची गहुमण्यांची पोत, 50 हजार रुपये किमतीची एक तोळ्याची सोन्याची पोत, 50 हजार ज्यामध्ये दोन मोबाईल असा एकूण 4 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व नगदी रुपये चोरून नेले आहेत. या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात कलम 457, 380 कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहे.



























































