
>> सुधाकर वसईकर
रमेश रावळकर यांची ‘राजहंस प्रकाशन’ प्रकाशित ‘टिशू पेपर’ ही ‘नाही रे’ वर्गाची कथा आणि व्यथा मांडणारी कादंबरी वाचताना असा मन विदीर्ण करणारा अनुभव वारंवार येत राहतो.
साधारण तीन दशकांपूर्वी हॉटेलला तशी फार प्रतिष्ठाही नव्हती. काळ बदलत गेला आणि जागतिकीकरणाच्या रेटय़ाने नव्याने तयार झालेल्या सामाजिक-काwटुंबिक समीकरणामुळे हॉटेलिंग या संकल्पनेला प्रतिष्ठा प्राप्त झाली, पण दुर्दैवाने या व्यवसायातील मानवी घटकांच्या वाटय़ाचे अव्हेरलेपण काही सुटले नाही. त्यांचे वर्तमानच नव्हे, तर भविष्यदेखील भूतकाळाच्या अंधारमय सावटाखाली खुरडत राहिले. अशाच दुनियेतील हाडामांसाच्या माणसांची ही कहाणे.
एकीकडे हॉटेलची चकचकीत, सुशोभित, झगमगाटी कॉस्मॉपॉलिटन तथाकथित प्रतिष्ठत दुनिया, तर दुसरीकडे भटारखान्यात काम करणाऱयांचे शोषण करणारे अंधकारमय जग. या अंधारी जगाला प्रतिष्ठा तर सोडाच, पण माणूस म्हणूनदेखील त्यातील कामगारांना मान्यता दिली जात नाही. त्यांचं भावविश्व, जगणं अंधकारमयच असतं. सकाळी हॉटेल उघडल्यापासून तर रात्री बंद होईपर्यंत आणि त्यानंतर बंद शटरमध्ये झोपी जाणारे हेल्पर, वेटर यांचं जगणं कसं असतं याचं रमेश रावळकर या उमद्या तरुण लेखकाने आपल्या पहिल्याच ‘टिश्यू पेपर’ या कादंबरीत प्रथम पुरुषी कथनातून प्रत्ययकारी तितपंच मनाला चटका लावणारं चित्रण रेखाटलंय. कादंबरीचा हा नायक हलाखीच्या परिस्थितीमुळे घरातून पळ काढून शहरात येतो, हॉटेलमध्ये काम करून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतो, तेव्हा घरच्यांना धक्काच बसतो. कारण हॉटेल लाईनीतील मुले बिघडतात असं त्यांना वाटतं.
अर्जुनला या परिस्थितीवश जगताना कितीतरी खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागतं. उपासमार, हॉटेलमध्येच काम करूनदेखील दोन रोटीस मोताद असणे. हेल्परचं सकाळी नाश्त्याला रोटय़ा लपवून ठेवणं, कस्टमरने हंडीत सोडलेली उरलीसुरली ग्रेव्ही रोटीबरोबर खाणे, सुट्टीच्या दिवशी किचन बंद असल्याने बाहेर कुठेतरी जाऊन खायला लागणे. पैसे नसले तर उपाशी रहाणे. यातून आपापसात होणाऱया भानगडी, हॉटेल मालक कधी कामावरून कमी करेल याची टांगती तलवार या आणि अशा कितीतरी हालअपेष्टा या शोषित कामगारांना सोसाव्या लागतात.
एकूण पस्तीस प्रकरणांत आत्मनिवेदनपर शैलीतील हे प्रसंग स्वानुभवावरून वाचकासमोर जसेच्या तसे उतरवण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरलाय. जणू हा भटारखानाच लेखकाने हॉटेलच्या चकचकीत मेजवर आणून ठेवलाय. एकाच वेळेस विषम आर्थिक स्तरावर पोटापाण्यासाठी वेगवेगळं जीवन जगणाऱया लोकांचं ठिकाण म्हणजे हॉटेल. सत्य कठोर, यातनादायी असलं तरी प्रखर असतं. मग ते कोणत्याही भाषाशैलीत मांडलं तरी मनाला भिडतं. या दुःखाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शोषितांचं जगणं वाचकांना वाचण्यास लेखक प्रवृत्त करतो. कटुसत्य असलं तरी ते मांडणं हे लेखकाचे धाडसच.
हॉटेल व्यवसाय जसजसा पह्फावत गेला तशी या व्यवसायाची समीकरणं बदलत गेली. वेटर म्हणून स्त्र्ााrदेखील या व्यवसायात आली. इथेही स्त्र्ााr उपभोग्य वस्तू म्हणूनच ‘बारबाला’ या गोंडस नावाखाली प्रॉडक्ट स्वरूपात धनिकांनी लोकांनी आणली. मुलींना या दलदलीत फसवून आणलं जातं हे जेव्हा त्याला पुढे जाऊन कळतं तेव्हा तो प्रचंड हादरतो, सुन्न होतो. नृत्याची आणि गायनाची आवड असलेल्या बांगलादेशी रेश्माला तिच्याच गल्लीतील अब्दुल खोटं खोटं सांगून मुंबईत आणतो आणि या दलदलीत अडकवतो. टिनालादेखील सय्यदने लग्न लावून देतो असं सांगून मुंबईत विकलेलं असतं. तिला ना नवरा मिळत ना सासर… अशा फसवून आणलेल्या मुलींचं बारमधलं असहाय जिणं बघून अर्जुनचं मन हेलावतं. ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणं.
‘टिश्यू पेपर’ कादंबरी लेखनामागे जीवनशोधाचे प्रयोजन आहे. पहिल्याच कादंबरीत मराठी साहित्यविश्वात निर्धोक आणि निर्भय वाटचाल करणारा रमेश रावळकर हा नवतरुण लेखक समाजातील विविध पैलूंवर लख्ख प्रकाश टाकतो. लहरी पर्यावरणामुळे जमिनीचे नापीक होणे, बेरोजगारीमुळे भरडला जाणारा उच्चशिक्षित तरुणांचा लोंढा शैक्षणिक संस्थांमध्ये बिनपगारी काम करण्याच्या नौबतीत अडकून अनेक समस्याने ग्रासलाय याचं भेदक चित्रण तीव्रतेने येतं. जे घडलंय ते प्रसंग लेखक वाचकांपुढे ठेवतो. मात्र त्यावर भाष्य करण्याचे खुबीने टाळतो. प्रसंगानुरूप पात्रांच्या तोंडी काही तत्त्वविधाने येतातही. मात्र तीही तुरळक. तरीही तीव्र संवेदनशीलता आणि भाजून काढणारी भावनिक दाहकता आणि ठाम वैचारिक भूमिका असणारं कादंबरी लेखन लेखकाचं सामाजिक भान अधोरेखित करतं. अन्वर हुसेन यांचं बोलपं मुखपृष्ठ आहे. तसेच अंतर्गत चित्रे कथानकास पूरक आहेत आणि राजन गवस यांचा ब्लर्ब लाभला असून हॉटेल जगत आणि तिथली काम करणारी माणसं यातील आर्थिक विषमतेची दरी समजून घ्यायची असल्यास ‘टिश्यू पेपर’ वाचायलाच हवी.
टिश्यू पेपर
लेखक – रमेश रावळकर
प्रकाशक – राजहंस प्रकाशन
पृष्ठ – 332, मूल्य – रुपये 400/-




























































