चंदगडच्या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

गुन्ह्यातील तपासात मदत करण्यासाठी तडजोडीत ठरलेल्या 40 हजारपैकी 20 हजारांची लाच स्वीकारल्याने चंदगडच्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. अमित भागवत पांडे (वय 34, सध्या रा. मजरे कार्वे, ता. चंदगड, मूळ रा. खोतवाडी, ता. हातकणंगले) असे अटक केलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार व त्याच्या वडिलांविरुद्ध दाखल असलेल्या गुह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पांडे याने त्यांच्याकडे प्रथम 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 40 हजार ठरले. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 20 हजार रुपयांची लाच घेताना अमित पांडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीस निरीक्षक नितीन कुंभार यांच्यासह सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई, सूरज अपराध यांच्या पथकाने ही कारवाई केली.