
बसच्या धडकेने वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी बोरिवली येथे घडली. बेचन हुसेन असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी बस चालक सागर पाखरेला अटक केली. बेचन हे बोरिवली येथे राहत होते. शनिवारी सकाळी बेचन हे शिंपोली येथून जात होते. तेव्हा बेस्टच्या बसने बेचन याना धडक दिली. या धडकेत बेचन हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी बेचनला मृत घोषित केले. अपघाताची माहिती समजताच बोरिवली पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून बस चालक सागर पाखरेला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

























































