उद्धव ठाकरे यांची काँग्रेस आमदारांनी घेतली भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गुरुवारी काँग्रेसच्या आमदारांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेतली आणि राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर चर्चा केली.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या काही प्रमुख पदाधिकाऱयांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, डॉ. नितीन राऊत, सुनील केदार, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, अमित देशमुख, झिशान सिद्धिकी आणि सत्यजीत तांबे या काँग्रेसच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस शिष्टमंडळाशी राज्यातील राजकीय स्थितीवर आणि विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा केली.