वारजेत दहशत निर्माण करणाऱ्या सराईताविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वारजे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईताविरूद्ध एमपीडीएनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. त्याला कोल्हापूरमधील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेली ही 71 वी कारवाई आहे.

व्यंकटेश उर्फ विकी शिवशंकर अनपुर (वय 31 रा. वारजे ) असे कारवाई केलेल्याचे नाव आहे. वारजे माळवाडी परिसरात व्यंकटेश अनपुर याने गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे केले आहेत. अग्नीशस्त्र, लोखंडी कोयता, तलवार, चाकु,  हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरूद्ध स्थानबद्धतेची कारवाई करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यंकटेश अनपुर याला एक वर्षासाठी कोल्हापूर कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश दिले.