आसाममधील पुराचा 22 लाख लोकांना फटका, 174 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या बहुतेक सगळ्या भागात पावसाची चांगली सुरुवात झाली असताना पूर्वांचलातील राज्यांना मात्र महापुराचा फटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आसाममध्ये पावसाचा जोर कायम असून आतापर्यंत 22 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे तर 174 जणांचा मृत्यू झाला आहे.

आसाममध्ये एप्रिलपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 34 पैकी 27 जिल्ह्यांना याचा फटका बसला आहे. अजूनही 1 हजार 934 गावांना पुराचा वेढा कायम आहे. महापूर आणि दरड कोसळून मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या 174 वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत नदीचा जलस्तर कमी झाल्यामुळे काही ठिकाणी परिस्थिती सुधारलेली आहे. तरीही ब्रम्हपुत्रा, कोपिली, दिसांग आणि बुरहीडिहिंग या नद्यांची धोक्याची पातळी अजूनही कायम आहे.