
जगातील सर्वात वयोवृद्ध एअर होस्टेसचा मान बेट्टे नष यांनी पटकावला आहे. या आठवडय़ात 86 वर्षीय बेट्टे नष यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. अमेरिकन एअरलाइन्सशी त्या दीर्घ काळापासून जोडलेल्या आहेत. बेट्टे यांनी आयुष्यातील 65 वर्षे एअर होस्टेस म्हणून काम केले आहे.
बेट्टे या मूळच्या मॅसॅच्युसेट्स येथील रहिवासी आहेत. इतक्या मोठय़ा कालावधीपासून एअर होस्टेस आहेत की, त्यांना अनेक प्रवासी ओळखतात. एका प्रवाशाने सांगितले की, त्याने आतापर्यंत अनेक वेळा विमानात प्रवास केला आहे. मात्र, ज्या मार्गावर बेट्टे नष असतात तो प्रवास स्पेशल होऊन जातो.
नवोदितांना सल्ले देताना बेट्टे सांगतात, या नोकरीत माणुसकीला प्राधान्य दिले पाहिजे. कोणतेही काम आनंद मिळेपर्यंत करा. केवळ आरोग्य व्यवस्थित आहे, तोपर्यंत काम करू नये.
























































