
BSNL कंपनीने त्यांच्या इंटरनेटसाठीच्या प्रीपेड प्लॅनमध्ये मोठे बदल केले आहेत. ग्राहकांना या विषयीची कोणतीही पूर्व कल्पना न देता अचानकच डेटा प्लॅन मध्ये बदल करण्यात आले आहेत. BSNL कंपनी नेहमीच उत्कृष्ट प्लॅन देऊन ग्राहकांना खूश करत असते. टेलिकॉम टॉकने दिलेल्या माहितीनुसार, BSNL ने आपल्या तीन प्रीपेड प्लॅनमध्ये एकाच वेळी बदल केले आहेत. बीएसएनएलने डेटा प्लॅनच्या किंमतीत प्रत्यक्षपणे वाढ न करता त्या प्लॅनची वैधता कमी केली आहे. वैधता कमी केल्यामुळे, प्लॅनचा दररोजचा वापर शुल्क 65 पैशांवरून 1.60 रुपया इतका झाला आहे. कंपनीने 99, 118, 319 रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये बदल केले आहेत.
BSNL चा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या पूर्वी BSNL च्या ग्राहकांना 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 22 दिवसांच्या वैधतेसह मिळत होता. तसेच या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधाही होती. आता या प्लॅनची वैधता 22 दिवसांवरुन 18 दिवस करण्यात आली आहे. या प्लॅनमधील अनलिमिटेड कॉलचा लाभ पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय या प्लॅनमध्ये इतर कोणतेही फायदे कंपनी देत नाहिये.
BSNL चा 118 रुपयांचा प्रीपेड प्लॅन
या आधी BSNL च्या 118 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दैनंदिन 0.5 GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलसह ग्राहकांना मिळत होता. या प्लॅनमध्ये एसएमएसची सुविधा या पूर्वी देण्यात आली नव्हती. या प्लॅनची वैधता 2 दिवसाएवढीच मर्यादित होती. तसेच मोफत पीआरबीटी (आपल्या मर्जीनुसार कॉलर ट्युन तयार करून ती सेट करणारी सुविधा) सेवाही यात देण्यात आली. आता कंपनीने या प्लॅनमध्ये काहीसा बदल करुन तो पुन्हा लाँच केला आहे. या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्वी प्रमाणेच सर्व फायदे घेता येणार आहेत परंतु, त्याची वैधता 20 दिवस करण्यात आली आहे.
BSNL चा 319 रुपयांचा प्रीपेड प्लॅन:
BSNL चा 319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता या आधी 75 दिवसांइतकी असून यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, 300 एसएमएस आणि सुमारे 10 GB डेटा देण्यात आला होता. आता त्याची वैधता 75 दिवसांवरुन 65 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे.























































