
युझर्सच्या स्मार्ट फोनमधील डेटा चोरी करणारा Autolycos हा नवीन मालवेअर गुगलने प्ले स्टोअरवर शोधला आहे. प्ले स्टोअरच्या या आठ ऍप्समध्ये या मालवेअरचा शिरकाव झाला होता. त्यामुळे गुगलने हे सर्व ऍप्स प्ले स्टोअरवरून तत्काळ हटवले आहेत. प्ले स्टोअरवरून हटवलेल्या ऍपमध्ये व्लॉग स्टार व्हिडीओ एडिटर, क्रिएटिव्ह थ्रीडी लाँचर, जीआयएफ इमोजी कीबोर्ड, फ्री ग्लो कॅमेरा 1.0.0, कोको कॅमेरा V1.1 : 1, फनी कॅमेरा, रेझर कीबोर्ड ऍण्ड थीम अशा ऍप्सचा समावेश आहे. ब्लीपिंग कॉम्प्युटर्सच्या माहितीनुसार, काही ऍप्स अजूनही प्ले स्टोअरवर सक्रिय आहेत, मात्र ज्यांच्या स्मार्ट फोनमध्ये अजूनही हे ऍप्स आहेत त्यांनी ते तत्काळ डिलीट करावे, अन्यथा तुमचा वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो, असा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.





















































