कोपरगाव पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठीची कोपरगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांची आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीमुळे कोणाचा पत्ता कट आणि कोणाला पुन्हा संधी मिळणार, याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

गुरुवारी 28 जुलै रोजी तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बालाजी क्षिरसागर यांच्या देखरेखीखाली ही सोडत काढली गेली आहे.सदर प्रसंगी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलादर मनीषा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

जाहीर झालेल्या गणांची नवे व पुढे आरक्षण दर्शवले आहे. धामोरी-सर्वसाधारण पुरुष, सुरेगाव-मागास वर्गीय स्त्री, ब्राम्हणगाव-जाती जमाती पुरुष, शिंगणापूर -अनुसूचित जाती-जमाती पुरुष, करंजी बु.-सर्वसाधारण पुरुष,दहिगाव बोलका-मागासवर्गीय -पुरुष,संवत्सर-अनुसूचित जातीजमाती महिला, कोकमठाण-सर्वसाधारण महिला, जेऊर कुंभारी- कोळपेवाडी- अनुसूचित जाती महिला, पोहेगाव-सर्वसाधारण पुरुष, रांजणगाव देशमुख-सर्वसाधारण महिला आदींचा समावेश आहे.

पंचायत समितीच्या मावळत्या सभागृहाची मुदत संपल्यामुळे सध्या पंचायत समितीत प्रशासक कामकाज पाहत आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा (ओबीसी) मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने ही आरक्षण सोडत लांबणीवर पडली होती. अखेर गुरुवारी ही सोडत पार पडली. यामुळे लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी कोपरगाव एक जागा वाढली आहे तर पंचायत समितीसाठी दोन जागा वाढल्या आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेसाठी सहा सदस्य तर पंचायत समिती साठी बारा सदस्य निवडून येणार आहेत. मावळत्या सभागृहात ही संख्या 15 इतकी होती. या जिल्हा परिषदेचे पाच सदस्य व पंचायत समितीचे दहा सदस्य होते. आता एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गण वाढ झाली आहे