
हिंदुस्थानी हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानच्या बारमेर जिह्यात कोसळले. गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत विमान पूर्णपणे जळून खाक झाले, तर दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. भिमडा गावाजवळ ही दुर्घटना घडल्याचे बारमेर जिह्याचे जिल्हाधिकारी लोक बंदू यांनी सांगितले. दुर्घटनेमागील कारण उघड झाले नसून सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.


























































