प्रथेच्या नावाखाली शेकडो डॉल्फिनची कत्तल, समुद्र झाला रक्ताने लाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डेन्मार्कमधील फॅरो बेटावरील स्थानिक नागरिकांनी प्रथेच्या नावाखाली तब्बल शेकडो डॉल्फिनची कत्तल केली आहे. डॉल्फिनच्या या सामूहिक हत्याकांडामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून प्राणीमित्रांनी त्याचा निषेध केला आहे.

या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात समुद्राच्या किनाऱ्यावर शेकडो डॉल्फिनचे मृतदेह ठेवलेले दिसत आहेत. तर समुद्राचे पाणी रक्ताने लाल झाले आहे. त्या पाण्यात अनेक जण उभे राहून शिकारीची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. या फोटो व व्हिडीओने जगभऱात खळबळ उडवली असून अनेकांनी याचा निषेध केला आहे. मात्र फॅऱो बेटावरील नागरिकांनी ही आपली पारंपारिक प्रथा असल्याचे म्हटले आहे.