
पश्चिम बंगालमधील शिक्षक घोटाळा प्रकरणात माजी मंत्री पार्थ चॅटर्जी व त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी या दोघांना शुक्रवारी बँकशाल न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. पार्थ चॅटर्जी यांनी लाच घेतल्याचा कुठलाही ठोस पुरावा सीबीआय किंवा ईडीने सादर केलेला नाही. सीबीआयच्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, असा युक्तिवाद पार्थ यांच्या वकिलांनी सुनावणीवेळी केला, तर अर्पिता मुखर्जीच्या जिवाला धोका असल्याचा दावा तिच्या वकिलांनी केला.
























































