
मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 584 रुग्ण सापडले तर एकाही मृत्यू झाला नाही. 584 रुग्णांपैकी 522 जणांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. 62 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 14 जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले.
दिवसभरात 407 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती 5 हजार 218 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाचे आज 1 हजार 189 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 142 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ती 12 हजार 148 वर पोहोचली आहे.
























































