मुद्दा – लिव्हर सिरोसीससाठी स्टेम सेल थेरपी ठरतेय प्रभावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> – डॉ. प्रदीप महाजन
(रिजनरेटिव्ह मेडिसीन एक्सपर्ट, स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नवी मुंबई)

जीवनशैलीचे आजार हळूहळू जागतिक स्तरावरील मृत्यूस कारणीभूत ठरतात. यकृताचा रोग ही अशीच एक स्थिती असल्याचे दिसून येत आहे, ज्यामध्ये दरवर्षी लक्षणीय रुग्ण संख्येत वाढ दिसून येते. 2017मध्ये प्रकाशित झालेल्या डब्ल्यूएचओ आकडेवारीनुसार भारतातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे 2.95% मृत्यूला यकृताचे आजार जबाबदार ठरतात. जागतिक स्तरावर सिरोसीस हे मृत्यूंपैकी प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी हिपॅटायटीस बी आणि सीसारखे संक्रमण हे मुख्य कारण होते. तथापि अल्कोहोलचे सेवन आणि लठ्ठपणा यामुळे यकृताचे विकार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यकृत हे अल्कोहोल आणि ड्रग्सचे ‘डिटॉक्सिफाय’ करते; परंतु इतर अनेक कार्येदेखील यकृत करत असतो जसे मेंदूला ग्लुकोज पुरवठा, अन्न पचन, गर्भाच्या विकासादरम्यान रक्त तयार करणे, पोषक द्रव्ये साठवणे, पुन्हा निर्माण करणे इत्यादी. म्हणून यकृताच्या आजाराच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे आणि त्वरीत उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे.

सिरोसीस ही अशी स्थिती आहे जिथे यकृतामध्ये चट्टे तयार होतात ज्यामुळे यकृताची सामान्य उती कडक होऊन अवयवाचे प्रभावी कार्य रोखले जाते. सिरोसीस आणि यकृताचा कर्करोग ही जागतिक स्तरावरील यकृताच्या आजारामुळे मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. अल्कोहोलचे सेवन, विषाणूजन्य हिपॅटायटीस, स्वयंप्रतिकार रोग, नॉन-अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग आणि अनेक अनुवंशिक चयापचय विकारांमुळे सिरोसीस होऊ शकतो. रोगाची प्रक्रिया यकृताच्या उतीमध्ये जळजळ (सूज) म्हणून सुरू होते, त्यानंतर डाग तयार होतात आणि शेवटी यकृत निकामी होते. सिरोसीसवर कोणताही इलाज नाही हे लक्षात घेता, लक्षणे आणि जीवनशैलीचे व्यवस्थापन याच पारंपरिक उपचारांचा मुख्य आधार आहे. गंभीर प्रकरणांसाठी यकृत प्रत्यारोपण हा एकमेव उपचारात्मक पर्याय आहे. तथापि अवयवांच्या कमतरतेचा मुद्दा एक प्रमुख आणि सतत वाढत जाणारा चिंतेचा विषय आहे.

एक जमेची बाजू म्हणजे यकृत स्वतःचे पुनरुत्पादन करू शकते, यकृत रोगाचे लवकरात लवकर निदान करणे आणि त्याची पुनरुत्पादक क्षमता वाढवण्याचे मार्ग शोधणे हा पुढचा मार्ग आहे. या ठिकाणी सेल आणि ग्रोथ फॅक्टर-आधारित थेरपी फायदेशीर ठरू शकते. आपल्या शरीरातील स्टेम पेशी यकृत (आणि इतर विविध) पेशींमध्ये फरक करण्यास सक्षम आहेत. याव्यतिरिक्त ते रोगप्रतिकारक प्रणालीचे नियमन करण्यास, जळजळ कमी करण्यास, रक्तपुरवठा वाढविण्यास आणि इतर पेशींना त्यांचे कार्य अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी उत्तेजित करण्यास सक्षम आहेत. त्याचप्रमाणे वाढीचे घटक रक्त/प्लेटलेट्सपासून वेगळे केले जाऊ शकतात, जे शरीराच्या पेशींसाठी पोषण म्हणून काम करतात. यकृताचे अंतर्गत वातावरण स्थिर करून ते बरे होण्यासाठी आणि पुनर्जन्मासाठी अधिक अनुकूल बनवून ते सिरोसीसमध्ये मदत करू शकतात.

“आम्ही फक्त यकृताच्या बरे होण्याच्या क्षमतेचा फायदा घेण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, जसे की डाग पडण्याआधी. अर्थात परिणाम वाढविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे; परंतु अंतिम उद्दिष्ट यकृत प्रत्यारोपणाची (किंवा किमानविलंब) गरज टाळण्यासाठी आहे, ज्यामुळे रुग्णाच्या जीवनमानावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.