शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्या अधिवेशनातच तब्बल 25 हजार 826 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. पुरवणी मागण्यांमध्ये कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांना 50 हजार रुपये अनुदान देण्यासाठी 4 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. महविकास आघाडी सरकारने एसटीसाठी केलेली 1000 कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांतही करण्यात आली असून मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षासाठी 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू झाले. पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या असल्या तरी राज्यातील अनेक जिह्यांत अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाली असून तब्बल 15 लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकेल असे खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनीच सांगितले असताना पुरवणी मागण्यांत शेतकऱयांच्या मदतीसाठी तरतूद करण्यात आली नाही.
2019 साली शेतकऱयांच्या कर्जमाफीची महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना मागच्या सरकारने जाहीर केली होती. यावेळी कर्जाची नियमित परतफेड करणाऱया शेतकऱयांनाही 25 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोविड व त्यामुळे आलेल्या आर्थिक संकटामुळे प्रत्यक्षात ही मदत देण्यात आली नव्हती. 2022-23 चा अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक वर्षांत ही मदत करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱयांना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये 4 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱयांना धान खरेदी अनुदानापोटी 500 कोटी तर वाहतूक व ऊस गाळप अनुदानासाठी 124 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत हद्दीतील पथदिव्यांच्या वीज देयकांची थकबाकी महावितरण पंपनीला देण्यासाठी 964 कोटी, 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार प्राप्त होणारे सहाय्यक अनुदान नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यासाठी 840 कोटी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी 780 कोटी, अंगणवाडी कर्मचाऱयांच्या वेतनासाठी 692 कोटी तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागणीत करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गासाठी 2000 कोटी!
गेली अनेक वर्षे रखडलेल्या रेवस ते रेडी या सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तेच काम पुढे नेताना सरकारने पुरवणी मागण्यांत 150 कोटींची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गासाठी 2000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
खातेनिहाय तरतुदी
सहकार, पणन, वस्त्राsद्योग 5 हजार 145 कोटी सार्वजनिक बांधकाम 4 हजार 295 कोटी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य 2 हजार 673 कोटी सार्वजनिक आरोग्य 2 हजार 259 कोटी गृह 1 हजार 993 कोटी नगरविकास हजार 886 कोटी महिला आणि बालविकास 1 हजार 672 कोटी ग्रामविकास 1 हजार 301 कोटी
देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषा भवनासाठी विशेष तरतूद केली होती. अर्थसंकल्पातील या तरतुदीनंतर नवीन सरकारकडून गुजराती भाषेच्या विकासासाठी तीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.





























































