हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा टीझर प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अॅक्शन- थ्रिलरपट ‘विक्रम वेधा’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. धडाकेबाज दृश्ये आणि आशयघन कथानक असलेल्या विक्रम- वेधा चा टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. यात वेधाच्या भूमिकेत अभिनेता हृतिक रोशन आहे, तर सैफ अली खानने विक्रम साकारला आहे. पुष्कर-गायत्री दिग्दर्शित ‘विक्रम वेधा’ येत्या 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. कडक शिस्तीचा पोलिस अधिकारी विक्रम गँगस्टर वेधाला पकडतो. त्यानंतर खऱया अर्थाने चोर पोलिसांचा पाठ शिवणीचा खेळ सुरू होतो. त्यानंतर वेधाच्या कथेचे पैलू उलगडत जातात.