
देशात सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 118 रुपयांची वाढ झाली असून सोन्याचा दर 51 हजार 668 रुपयांवर पोहचला आहे. सोन्याचे दर असेच वाढत राहिल्यास वर्षअखेर म्हणजे डिसेंबरपर्यंत प्रतितोळय़ाचा दर 60 हजार रुपयांवर जाईल असा अंदाज इंडियन बुलियन ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या आठवडय़ात चांदीच्या दरातही प्रतिकिलोला तीन हजार रुपयांची वाढ होऊन 55 हजार 607 रुपये एवढा झाला आहे. तो डिसेंबरपर्यंत 60 हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतो.




























































