
संभाजी ब्रिगेडनंतर आता मराठा सेवा संघानेही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मराठा सेवा संघ ही संभाजी ब्रिगेडचीच मातृसंस्था आहे. मराठा सेवा संघाच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेला मराठा समाजाचे आणखी बळ मिळाले आहे.
शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीला मराठा सेवा संघानेही पाठिंबा दिला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीची सत्ता राज्यात आणणार असल्याचे संघाने म्हटले आहे. मराठा सेवा संघाचा 32 वा वर्धापन दिन नुकताच झाला. त्यानिमित्त बोलताना संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी मराठा सेवा संघ आता नव्या रुपात येणार असल्याचे सांगितले. पुढील काळात मराठा सेवा संघ अधिक तरुण असणार आहे. आता 40 वर्षांखालील तरुण व मराठा उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱयांकडे संघाचे काम सोपवण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.


























































