
खूनाच्या प्रयत्नाचे सहा गुन्हे दाखल असलेल्या अल्पवयीनाला साथीदारासह युनीट तीनने वडगाव पुलाखालून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपुर्वी त्यांनी एकावर पिस्तूलातून गोळ्या झाडून खूनाचा प्रयत्न केला होता. ही घटना सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत हिंगणे खुर्दमध्ये 18 ऑगस्टला घडली होती.
आरोपींनी पुर्ववैमनस्यातून शुभम जयराज मोरे (23, रा. नीलयपद सोसायटी, माणिकवाग) त्याच्यावर सत्तूरने वार करून गोळ्या झाडून खूनाचा प्रयत्न केला होता. गुन्ह्यातील दोघे अल्पवयीन वडगाव परिसरात असल्याची माहिती पोलिस शिपाई राकेश टेकावडे यांना मिळाली. पथकाने फरार अल्पवयीनांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, शरद वाकसे, किरण पवार, सुजीत पवार, संजिव कळंबे, प्रकाश कटटे, ज्ञानेश्वर चित्ते, दिपक क्षिरसागर, गणेश शिंदे, साईनाथ पाटील, सतिश कत्रांळे, प्रताप पडवळ, राकेश टेकावडे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांनी केली.




























































