
पाच दिवसांच्या गणपतींचे उद्या रविवारी विसर्जन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून मुंबईतील समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. 10 हजार अधिकारी-कर्मचाऱयांसह 786 जीवरक्षक तैनात राहतील.
मुंबई महापालिकेने सर्व सुविधांबरोबर कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेतली आहे. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाइन नोंदणी सुविधा https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. महापालिकेने 24 प्रशासकीय विभागांच्या स्तरावर 188 नियंत्रण कक्ष स्थापन केले असून नैसर्गिक विसर्जनस्थळी आवश्यक तेथे 45 मोटार बोट आणि 39 जर्मन तराफा व्यवस्था करण्यात आली आहे. समन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जनस्थळी 211 स्वागत कक्ष तयार करण्यात आले आहेत.
विसर्जनासाठी चोख व्यवस्था
मुंबईतील समुद्रकिनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या वतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्रकिनाऱयांसह आरे कॉलनी व इतर ठिकाणच्या तलावांवर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यंदा दीड दिवसाच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
48 निरीक्षण मनोरे
अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी 48 निरीक्षण मनोरे आणि आवश्यक तेथे संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. प्रकाश व्यवस्थेसाठी 3 हजार 069 फ्लड लाईट आणि 71 सर्च लाईट व्यवस्था केली आहे. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी वैद्यकीय सामुग्रीसह सुसज्ज असणारे 188 प्रथमोपचार पेंद्रे आणि 83 रुग्णवाहिका तैनात असतील. निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे 357 निर्माल्य कलश आणि 287 निर्माल्य वाहने नेमण्यात आली आहेत. महत्त्वाच्या विसर्जन स्थळी 134 तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था केली आहे. चौपाटय़ांवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱया वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत यासाठी 460 पोलादी प्लेटची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व 24 वॉर्डमध्ये प्रशासकीय विभागांमध्ये कृत्रिम विसर्जन स्थळांची व्यवस्था करण्यात आली आहे.





























































