आरेतील बिबटय़ाची व्यथा शिवसम्राटने मांडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर नित्यानंद नगरमधील शिवसम्राट श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘आरे मेट्रो कारशेड व बिबटय़ाची आत्मकथा’ या विषयावर चलचित्र देखावा सादर केला आहे. आरेच्या मेट्रो कारशेडला महाविकास आघाडी सरकारने दिलेली स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने उठवली असून त्यामुळे आरेत जंगलाची जैवविविधता, प्राणी-पक्ष्यांवर होणारा दाहक परिणाम यात दाखवला आहे.

बिबटय़ासारख्या दुर्मिळ प्राण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. जंगलतोड करून आपण अशा मुक्या प्राण्यांवर अन्याय करत आहेत व त्यांना वेदना पोहोचवत आहोत. भविष्यात हे मेट्रो कारशेड झाले तरी बिबटय़ासारखा वन्यप्राणी हा मेट्रो परिसरात येणार आणि तेथील प्रवाशांवर हल्ला करू शकतो असा संदेश या चलचित्रातून देण्यात आला आहे.