फंगल इन्फेक्शन म्हणजे काय?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या संसर्गाचे दिवस सुरु आहेत.किती प्रकारची फंगल इन्फेक्शन असतात?बुरशीचे संसर्ग अनेक प्रकारचे असतात. यातील बहुतेक संसर्ग सभोवतालच्या वातावरणातअसतात. यांच्यापासून धोका नसतो. यामध्ये नखं, तोंड, गळा, त्वचा, शरीराचे नाजूक भागसंसर्गित होऊ शकतात. पण हे संसर्ग सामान्य आहेत. या फंगसप्रमाणे यलो फंगसदेखीलसामान्य फंगस आहे. हे बुरशीचे संसर्ग रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे होतात. तरकाही संसर्ग जीवघेणेही ठरू शकतात.कमी रोग प्रतिकारशक्तीमुळे संसर्गाशी सामना करता येत नाही. एचआयव्ही, कर्करोगाचेरुग्ण, ज्या रुग्णांचे ओर्गान ट्रान्सप्लांट झाले किंवा इतर औषधांच्या अतिरिक्त सेवनामुळेहीरोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि फंगल इन्फेक्शन होऊ शकते. कोरोना बाधित,मधुमेहींना अशा संसर्गाचा धोका अधिक असू शकतो.

कोणता फंगस जास्त धोकादायक?

संशोधकांचे म्हणणे आहे की या बुरशीला घाबरण्याचे कारण नाही. याप्रकारचे फंगसपर्यावरणात आधीपासून असतात. या फंगसमुळे जीव जाण्याचा धोका नाही. ही बुरशीमाती, शिळे पदार्थ, आणि ओल असलेल्या ठिकाणी आढळते.या संसर्गापासून बचावासाठी काय करावे?फंगल इन्फेक्शन स्वच्छतेशी संबधित आहे. काळ्या बुरशीपासून वाचण्यासाठी डॉक्टर धूळअसलेल्या परिसरापासून दूर राहण्यास सांगतात. याशिवाय मातीत काम करताना हातातग्लाव्ह्ज घालण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रुग्णांच्या स्वच्छतेची आणि त्यांच्याशीसंबंधित उपकरणांच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते.