
विमान प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट प्रशासनाने विमानतळापासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली असून आता या बसची आसने बेस्टच्या ‘चलो अॅप’द्वारे आरक्षित करता येणार आहेत.
एअरपोर्ट-1 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-2) पासून दक्षिण मुंबई – बॅकबे आगार, एअरपोर्ट-2 छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-2) पासून जलवायू विहार-खारघर व्हाया पाम बिच रोड आणि एअरपोर्ट-4 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी-2) पासून पॅडबरी जंक्शन – ठाणे अशा तीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केल्या आहेत. उद्या 9 सप्टेंबरपासून बेस्ट ‘चलो अॅप’चा वापर करून तिकिटाचे आगाऊ आरक्षण करून प्रवाशी या बस सेवेचा लाभ घेऊ शकतात. याकरिता खालील या पाच बाबी प्रवाशांना करायच्या आहेत.
z गुगल प्ले स्टोअरवरून बेस्ट ‘चलो अॅप’ डाऊनलोड करावे. त्यानंतर दक्षिण मुंबईकर बस मार्ग क्र. 881, वाशी-खारघरकरिता बस मार्ग क्र. 882 आणि ठाण्याकरिता बस मार्ग क्र. 884 सर्च बारवर शोधावा. z रिझर्व्ह सीट पर्याय निवडावा. z बसमध्ये चढण्याचे, उतरण्याचे ठिकाण निवडावे. z आपली वेळ निवडून तिकिट काढावे. z आपली बस ट्रक करून आरक्षित केलेल्या आसनाद्वारे आरामदायक प्रवास करावा.
























































