सत्तेसाठी ते काहीही करायला तयार, सुप्रिया सुळेंचा एकनाथ शिंदेंना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांशी बोलताना ईडी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मविआ सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देण्याचा जो सपाटा लावला आहे, त्याचा निषेध देखील केला.

”स्वत:च घेतलेले निर्णय स्वत: बदलणारे हे पहिलंच सरकार मी बघितलं आहे. अडीच वर्षापूर्वी त्यांनी स्वत: निर्णय घेतले. ते सर्व निर्णय आता त्यांनी स्वत:च्या खुर्चीसाठी बदलले. किती माणूस खुर्चीसाठी स्वत:साठी तडजोड करू शकतो. याचं एक वेगळं उदाहरण महाराष्ट्राला बघायला मिळतंय. सत्तेसाठी काहीही करायला तयार आहेत. लोकांचं नुकसान झालं तरी चालेल पण स्वत:च नुकसान झालं नाही पाहिजे. असं हे स्वार्थी ईडी सरकार आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

अडीच महिन्यानंतरही जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत. सगली कामं थांबलेली आहेत. मेरिटवरची कामं रखडलेली आहेत. ही काही माझ्या किंवा दादांच्या घरची कामं नाहीत. ती मायबाप जनतेची कामं आहेत. ती सगळी कामं. या सगळ्या कामां जी स्थगिती दिली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते.”, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी ईडी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी तत्काळ निवडणूका घ्याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ”माझी ईडी सरकारला विनंती आहे, तातडीने निवडणूका घ्या. जनतेची कामं रखडली आहेत. प्रशासकांकडून ही कामं होत नाहीएत. त्यामुळे तातडीने निवडणूका घेण्याची गरज आहे”, असे त्या म्हणाल्या.