ब्रेकऐवजी एक्सलरेटर दाबला, रुग्णवाहिकेच्या तर्राट चालकाच्या चुकीमुळे 3 जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दारू पिऊन रुग्णवाहिका चालवणाऱ्या एका चालकाने तीन जणांना ठार केल्याची घटना गाझियाबाद येथे घडली आहे. या अपघातानंतर हा चालक पळून गेला होता. मात्र, त्याला पकडण्यात आलं.

हा अपघात रविवारी रात्री 11 वाजता सिद्धार्थ विहार येथील लिंक रोडवर हा भीषण अपघात झाला. या मार्गावरून विनीत देशवाल नावाचा चालक एक खासगी रुग्णवाहिका घेऊन निघाला होता. विनीत दारूच्या नशेत होता. त्याने वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबायचा प्रयत्न केला. पण, ब्रेकऐवजी त्याने एक्सलरेटर दाबला.

त्यामुळे रुग्णवाहिका समोरून येणाऱ्या बाईकला धडकली. बाईकवर चालकाच्या मागे बसलेला माणूस या धडकेमुळे खाली पडला आणि रुग्णवाहिकेच्या चाकाखाली चिरडला गेला. दारूच्या नशेत गाडी थांबवण्यासाठी पुन्हा एक्सलरेटर दाबल्याने रुग्णवाहिका पुढे जाऊन एका थांबलेल्या बाईकला धडकली. दुर्दैवाने त्या बाईकवर बसून जाण्यासाठी ती न्यायला आलेले दोन जण त्या तडाख्यात सापडले.

या अपघातानंतर विनीतने पळून जायचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पकडण्यात यश आलं. या अपघातात राजकुमारी (55), मनमोहन शर्मा (34) आणि ऋषिपाल (30) यांचा मृत्यू झाला. तर राजकुमारी यांचा मुलगा संदीप आणि त्याचा भाचा टिपू (4) हे दोघंही रुग्णालयात मृत्युशी झुंज देत आहेत.