बीई, बीटेक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळपत्रक जाहीर, ऑनलाइन नोंदणीला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने चार वर्षे बीई, बीटेक आणि पाच वर्षे मास्टर ऑफ इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणीला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना 4 ऑक्टोबरला सायंकाळी 4 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येणार आहे. एमएचटी-सीईटीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना या प्रवेशाचे नोंदणी शुल्क भरण्याची आवश्यकता नसल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर व्हावी यासाठी दोनच कॅप राऊंड घेण्यात आल्या होत्या, मात्र यंदा नियमितपणे तीन कॅप राऊंड होणार आहेत.

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक
n ऑनलाइन नोंदणी – 4 ऑक्टोबर, सायंकाळी 4 वाजेपर्यंत
n कागदपत्रांची पडताळणी – 4 ऑक्टोबर, सायंकाळी 6 वाजेपर्यंत
n प्रोव्हिजनल गुणवत्ता यादी – 7 ऑक्टोबर
n हरकती व सूचना नोंदविणे – 8 ते 10 ऑक्टोबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
n अंतिम गुणवत्ता यादी – 12 ऑक्टोबर
n कॅप राऊंड-1 साठी पसंतीक्रम भरणे, अर्ज सबमिट करणे – 13 ते 15 ऑक्टोबर
n गुणवत्ता यादी – 18 ऑक्टोबर
n प्रवेश घेणे – 19 ते 21 ऑक्टोबर
n कॅप राऊंड-2 साठी उपलब्ध जागांची यादी – 22 ऑक्टोबर
n पसंतीक्रम भरणे, अर्ज सबमिट करणे – 23 ते 26 ऑक्टोबर
n गुणवत्ता यादी – 28 ऑक्टोबर
n प्रवेश घेणे – 29 ते 31 ऑक्टोबर
n कॅप राऊंड-3 जागांची यादी – 1 नोव्हेंबर
n पसंतीक्रम भरणे, अर्ज करणे – 2 ते 4 नोव्हेंबर
n गुणवत्ता यादी – 6 नोव्हेंबर
n प्रवेश घेणे – 7 ते 9 नोव्हेंबर