आपण आईला भेटायला बारामतीला जातो, मात्र फोटोसेशन करत नाही; अजित पवार यांचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव न घेता त्यांना जोरदार टोला लगावला आहे. आईला भेटायला गेल्यावर या भेटीचे फोटो काढण्यावरून अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आपणही बारामतीला आईला भेटायला येतो, मात्र त्याचे फोटो काढत नाही, असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे.

अजित पवार एका कार्यक्रमात बोलत होते. मला काठेवाडीवरून मुंबईला पाठवलं. गेलो ना तिथे. राहतोय ना तिथे. मीसुद्धा आईला भेटायला येतो पण फोटो काढत नाही. भेट घेतो आणि जातो. आताही ही सभा संपल्यावर आईला भेटायला जाणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. राज्य सरकारने केलेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरही अजित पवार यांनी टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत त्यांनी टीका केली. एक जिल्हा सांभाळताना मला नाकी नऊ येत होते. सहा सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद घेणारे काम कसं करणार? असा सवाल त्यांनी केला. तरीही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा, अशा शब्दांत त्यांनी आपल्या शैलीत अजित पवार यांनी टोला लगावला.