आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत होडी पलटून अपघात, 30 पैकी 7 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील धुबरी जिल्ह्यात गुरुवारी ब्रह्मपुत्रा नदीत होडी पलटून अपघात झाला. या होडीतून सुमारे 30 जण प्रवास करत होते. त्यापैकी 7 जण बेपत्ता झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने त्वरित बचावकार्य सुरू केलं.

ही होडी 30 जणांना घेऊन जात होती. या होडीतून अनेक शाळकरी विद्यार्थी देखील प्रवास करत होते. मात्र, अचानक ही होडी उलटली आणि प्रवासी नदीत पडले.

या प्रवाशांपैकी अनेकांना वाचवण्यात यश आलं असलं तरी त्यातील सहा ते सात जण अद्यापही बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. या शोधासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं अथक प्रयत्न करत आहेत.