त्रिपुरासुंदरी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रह्मा-विष्णू -शंकराची शक्ती असणाऱया जगतजननी त्रिपुरासुंदरी मातेच्या दर्शनाचा लाभ भाविकांना आता मुंबापुरीत घेता येत आहे.  गोरेगाव पश्चिमेकडील बेस्ट नगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात नुकतीच त्रिपुरासुंदरी मातेची भव्यदिव्य अशी मूर्ती विराजमान झाली आहे. नवरात्रीत मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.

महाराष्ट्रातील त्रिपुरासुंदरी मातेचे हे एकमेव मंदिर आहे. मंदिराचे विश्वस्त डॉ. स्वरूप प्रामाणिक आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री हे दांपत्य मनोभावे त्रिपुरासुंदरी मातेची पूजा करत असतात. यंदा त्रिपुरासुंदरी मातेचा हा पहिला नवरात्रोत्सव साजरा होत आहे. यानिमित्त दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अष्टमीला म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून कुमारिका पूजन कार्यक्रम होणार आहे.