उद्धव ठाकरेंकडून सत्ता व धनुष्यबाण हिसकावलं, हे राज्यातील जनतेला आवडलं नाही – जयंत पाटील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाला महाराष्ट्रात महत्त्व आहे. चिन्हापेक्षा लोकभावनेला जास्त महत्त्व आहे, उद्धव ठाकरे यांची फसवणूक करून जे आमदार शिंदे गटात गेले आहेत. महाराष्ट्रात जनमत त्यांच्याविरोधात फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातील सर्व जनता आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ता हिसकावून घेतली. उद्धव ठाकरे यांच्याकडून धनुष्यबाण हिसकावून घेतलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडलेलं नाही, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

राज्यात शिंदे सरकार आल्यापासून विरोधकांना कमजोर करण्याचं काम केलं जात आहे. ज्या पायावर हे सरकार उभे राहिले आहे, त्याला कोणतंही नैतिक अधिष्ठान नाही, असेही जयंत पाटील म्हणाले. शिंदेंनी जरी धनुष्यबाणावर दावा केला. चिन्ह गोठवण्यात आलं. तरी उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळालं आणि ते लोकप्रिय झालं. आता शिंदेंनी पुढचं पाऊल टाकलं. मशाल बदलण्याचा प्रयत्न केला. तरी पुढे मिळणारं जे चिन्ह असेल तेही तितकंच लोकप्रिय होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

रमेश लटकेंच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली. त्या अंधेरीच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार ऋतुजा लटके याच शंभर टक्के निवडून येणार, असा विश्वासही जयंत पाटलांनी व्यक्त केला.