
>> डॉ. ज्योती धर्माधिकारी
कॅनडाच्या अर्थमंत्रीपदावर पहिल्यांदाच फ्रिलँड यांच्या रूपाने एका महिलेची नियुक्ती झाल्यामुळे कॅनडातील महिलांमध्ये एक प्रकारची प्रेरणा मिळाली आहे. पंतप्रधानपदाच्या खालोखाल असणारी महत्त्वाची भूमिका एका धडाडीच्या, विलक्षण विवेकी आणि प्रतिभावंत महिलेला सुरुवातीपासूनच देण्यात आली. म्हणूनच कॅनडामधील राजकीय विश्लेषक त्यांना ‘सर्व खात्याचे सर्वेसर्वा’ मंत्री याच नावाने संबोधतात.
ऑगस्ट 18, 2020 रोजी कॅनडाच्या अर्थमंत्रीपदावर पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती झाली. पंतप्रधान जस्टिन टडो यांनी बिल मॉर्नो यांच्या राजीनाम्यानंतर उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांची अर्थमंत्री या पदावर नेमणूक केली. फ्रीलँड या टडो यांच्या अत्यंत विश्वासू लोकांपैकी एक समजल्या जातात. अमेरिकेसोबतच्या खुल्या व्यापारासाठी सकारात्मक असल्यामुळेच कॅनडाचे अर्थमंत्रीपद त्यांना मिळाले असे बोलले जाते. कोरोना या साथरोगाच्या काळामध्ये कॅनडाची अर्थव्यवस्था डगमगली. विरोधी पक्ष कन्झर्व्हेटिव्ह पार्टीने श्री. टडो आणि श्री. मॉर्नो यांच्यावर शरसंधान साधले आणि सातत्याने अर्थमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. कोरोनाच्या काळात आर्थिक व्यवस्थापन करण्यास अपात्र ठरल्यामुळे श्री. मॉर्नो यांनी राजीनामा दिला. त्या पदावर जास्त सक्षम व्यक्तीची गरज होती हे निश्चित आणि फ्रीलँड याच त्या पदासाठी सर्वतोपरी योग्य व्यक्ती होत्या.
कॅनडा हा मोठा भूभाग असलेला देश आहे. एकूण क्षेत्रफळानुसार कॅनडा हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आणि पश्चिम गोलार्धातील सर्वात मोठा देश आहे. उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेला पॅनडा हा बलाढय़ देश आहे. हा देश सर्व क्षेत्रांतील लिंग समानतेच्या बाबतीत जगामध्ये सर्वात प्रगतीशील देश आहे. मात्र अर्थमंत्री पदावर काम करणाऱ्या फ्रीलँड या पहिल्याच महिला आहेत.
52 वर्षीय फ्रीलँड (जन्मः 2 ऑगस्ट 1968, पीस रिव्हर, कॅनडा येथे) या हॉर्वर्ड येथील पदवीधर आहेत आणि ऱ्होडस शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या बुद्धिमान विद्यार्थिनी आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी रशियन इतिहास आणि साहित्य या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यांचे पती ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे पत्रकार आणि प्रसिद्ध ब्रिटिश लेखक आहेत. या दोघांना तीन अपत्ये आहेत. विशेष म्हणजे त्यांची आई युक्रेन देशाची नागरिक आणि वकील आहे. त्यामुळे स्वतः फ्रीलँड मुलांसोबत युव्रेनियन भाषेतच बोलतात. यासह फ्रीलँड यांना फ्रेंच, इंग्लिश, रशियन, इटालियन अशा पाच भाषा अवगत आहेत.
खरं तर त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात त्यांनी पत्रकारितेपासून केली. 2013 मध्ये जेव्हा पॅनडामध्ये लिबरल पार्टी हा तीन नंबरचा पक्ष होता. त्यावेळी दूरदृष्टीच्या टडो यांनी स्वतः फ्रीलँड यांची लिबरल पार्टीमध्ये नियुक्ती केली होती.
त्यापूर्वी, पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘द इकॉनॉमिस्ट’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ आणि ‘फायनान्शियल टाइम्स’ या वर्तमानपत्रांसाठी युव्रेन येथूनच कामाला सुरुवात केली होती. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कॅनडाचे झुकते माप युव्रेनला राहिले आहे. युक्रेनला सर्वतोपरी मदत करण्यासाठी कॅनडा कटिबद्ध होते, यामागे फ्रीलँडची युक्रेनबद्दलची सहानुभूती आहे असे म्हणतात. कॅनडाने युक्रेनला मोठी आर्थिक मदत पाठवली, त्यामागेही फ्रीलँड याच होत्या.
त्यांनी विविध वर्तमानपत्रांमध्ये पत्रकारितेचा अनुभव घेतला. ‘राऊटर्स न्यूज’मध्ये त्या वरिष्ठ पदावर काम करत होत्या. ‘फायनान्शियल टाइम्स’ या वर्तमानपत्रात काम करत असताना त्यांनी मॉस्को ब्युरो चीफ म्हणून जबाबदारी सांभाळली होती. सोव्हिएत युनियनची पडझड त्यांनी डोळ्यांनी पाहिली आहे आणि त्याचे आर्थिक विश्लेषण केले. विविध आंतरराष्ट्रीय घडामोडींचे राजकीय आणि आर्थिक विश्लेषण करण्याचा त्यांचा छंद पत्रकारितेतून पूर्ण करता आला. 2014 या वर्षी रशियामध्ये येण्याची बंदी करण्यात आलेल्या दहा पत्रकारांपैकी त्याही होत्या. त्या रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कायम कठोर टीकाकार राहिल्या आहेत.
लिबरल पक्षात प्रवेश केल्यानंतर त्या 2015 मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून पहिल्यांदा संसदेमध्ये जाऊन बसल्या. जस्टिन टडो पंतप्रधान बनले आणि त्यांनी पेंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फ्रीलँड यांचा समावेश केला. त्यावेळी ते एक आघाडी सरकार होते. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि विदेश मंत्री हे खाते सोपवण्यात आले. या पदावर असताना त्यांची पॅनडा-अमेरिका-मेक्सिको करारामध्ये महत्त्वाची भूमिका होती, तसेच युरोपियन युनियनसोबत व्यापार वाढवण्यासाठीही प्रयत्नशील होत्या.
2019च्या निवडणुकीमध्ये पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले. निवडून आल्यानंतर लगेच त्यांची नियुक्ती उपपंतप्रधान म्हणून करण्यात आली होती. अर्थमंत्री म्हणून त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. 2021 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा मुद्दा बालसंगोपन होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना बालसंगोपनाला अधिक महत्त्व देण्याची गरज वाटली. जागतिक अर्थकारणावर त्यांचे बारीक लक्ष असते. नुकतेच त्यांनी रशियावर नैसर्गिक इंधन खरेदीबाबत हिंदुस्थान आणि चीनला झुकते माप देत असल्याचा आरोप केला आहे.
कॅनडातील मंत्रिमंडळामध्ये एकूण 35 मंत्री आहेत. पंतप्रधानपद वगळता 17 पुरुष मंत्री आणि 17 स्त्रिया मंत्री आहेत. लिंग-समानतेमुळे महिलांना पुरेसे संरक्षण आणि सवलत मिळते. तेथील महिला स्वतंत्र आणि महत्त्वाकांक्षी आहेत. महिलांच्या तुल्यबळ मानवसंसाधनामुळे देश आर्थिक महासत्ता बनत आहे. टडो सरकारमध्ये पंतप्रधानपदाच्या खालोखाल भूमिका एका धडाडीच्या, विलक्षण विवेकी आणि प्रतिभावंत महिलेला सुरुवातीपासूनच देण्यात आली होती. पॅनडामधील राजकीय विश्लेषक त्यांना ‘सर्व खात्याचे सर्वेसर्वा’ मंत्री याच नावाने संबोधतात. 2019 पासून फ्रीलँड यांनी टडो यांचा विश्वास संपादन केला. पॅनडाच्या अर्थमंत्रीपदावर पहिल्यांदाच फ्रिलँड यांच्या रूपाने एका महिलेची नियुक्ती झाल्यामुळे पॅनडातील महिलांमध्ये एक प्रकारची प्रेरणा मिळाली. तेथील स्त्रियांना फ्रीलँड यांचा अभिमान वाटतो. 2018 मध्ये त्यांना विदेशी धोरणाबाबत शिष्टाईसाठी ओळखले गेले तर ट्रान्स-अॅटलांटिक देशातील दुवे मजबूत करण्यासाठी अॅटलांटिक-ब्रूक यांच्यातर्फे ‘एरिक वारबर्ग पुरस्कार’ मिळाला. मानवाधिकार आणि लोकशाही व्यवस्थेसाठी कामासाठी त्यांना ‘मार्क पाल्मर पुरस्कार’ मिळाला. त्यांची पुढील वाटचाल निर्विवादपणे सुनिश्चित पंतप्रधानपदाकडे सुरू आहे. क्रिस्टिया फ्रीलँड या विजिगिषु स्त्रीकडून जगभरातील महिला प्रेरणा मिळते हे निश्चित.
[email protected]
(लेखिका राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय, जालना येथे इंग्रजी विभागाच्या प्रमुख आहेत.)































































