
युगांडा देशातील एका अंध मुलांच्या शाळेला भीषण आग लागल्याचं वृत्त आहे. या दुर्दैवी घटनेत 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीचं कारण अद्याप अज्ञात असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य युगांडामधील मुकोनो जिल्ह्यात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला येथील एका अंध विद्यालयात भीषण आग लागली.
या आगीत 11 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाला. सहा विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.



























































