भाजप अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या अल्पसंख्याक विभागाला वॉर्ड क्र. 28 मध्ये खिंडार पडले आहे. अल्पसंख्याक विभागाचे वॉर्ड अध्यक्ष अब्दुल गफ्फार शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.
शिवसेना विधानसभा संघटक निरव बारोट यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाल्याची माहिती शाखा क्रमांक 28 चे शाखाप्रमुख प्रशांत जयसिंग कोकणे यांनी दिली. अब्दुल शेख यांच्याबरोबरच आदिल शेख, अनिस शेख, इस्माईल शेख, लालू विश्वकर्मा, लतीफ खुरेशी, मल्कंखा अत्रंगी, फारुख शेख, बाबा शेख यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारानुसार काम करण्याची ग्वाहीही दिली आहे. यावेळी विधानसभा संघटक धनावडे, शाखाप्रमुख सचिन पाटील, उपशाखाप्रमुख, शिवसैनिक उपस्थित होते.