
वाघांच्या वाढत्या मृत्यूमुळे वन विभाग चिंतेत असताना परत एका वाघिणीचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गस्तीवरील पथकाला हिंगणा नाल्यात वाघीण मृतावस्थेत दिसून आली. प्राथमिक माहितीनुसार वाघिणीचा मृत्यू हा हृदय श्वसन क्रिया बंद पडल्याने झाल्याचे दिसून आले आहे. फॉरेन्सिककरिता नमुने घेण्यात आले आहेत. त्यानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आले.





























































