
गॉडविट या पक्ष्याने विक्रम केला आहे. गॉडविटने अलास्का ते टास्मानिया हा 13 हजार 560 किलोमीटरचा प्रवास एका दमात पार केला आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्या पक्ष्याने हा विक्रम केला, त्याचे वय पाच महिने आहे. पक्षीतज्ञांनी या पक्ष्याला टॅग करून त्याच्या नोंदी ठेवल्या. गॉडविटने 13 ऑक्टोबर रोजी अलास्कामधून उड्डाण केले आणि तो 24 ऑक्टोबर रोजी टास्मानियातील जमिनीवर उतरला. प्रवासाच्या मॅपवरून असं दिसतंय की, तो 11 दिवस कुठेही थांबला नाही.




























































