
फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपवर कम्युनिटीज फीचर सुरू करण्याची घोषणा केली आहे. हे फिचर आजपासून जागतिक स्तरावर आणले गेले आहे.
कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपच्या कम्युनिटी फीचरबद्दल घोषणा केली होती. कंपनी अनेक झोनमध्ये त्याची चाचणी करत होती. या फीचरमुळे यूजर्स ग्रुपमध्ये कनेक्ट होऊ शकतील. ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा एक वेगळा ग्रृप तयार करून त्यातील निवडक लोकांना संदेश पाठवू शकता.
कम्युनिटी फिचर कसा वापरायचा?
Android मोबाइलमध्ये चॅटच्या सुरुवातीला असलेल्या कम्युनिटी टॅबवर क्लिक करू शकतात. तेथून ते नवीन गट किंवा पूर्वी जोडलेल्या गटातून समुदाय सुरू करू शकतात.






























































