अंधेरी पोटनिवडणुकीचा आज निकाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून ऋतुजा लटके यांच्यासह एकूण सात उमेदवार रिंगणात असून रविवार, 6 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल घोषित होणार आहे.

अंधेरीच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विरोधात सुरुवातीला भाजपने उमेदवार दिला होता, मात्र पराभवाच्या भीतीने भाजपने या निवडणुकीतून पळ काढला. या निवडणुकीत शिवसेना उमेदवार ऋतुजा लटके यांचे पारडे सुरुवातीपासूनच जड असून त्यांचा सहज विजय होईल. निवडणुकीत झालेल्या 31.74 टक्के मतांची मोजणी गुंदवली म्युनिसिपल शाळा या ठिकाणी रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीआधी घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे या निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे.