
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएल न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक खरं बोलणारा शिवसैनिक या निर्णयाचे स्वागत करतोय अशी प्रतिक्रिया युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. संजय राऊत हे खरे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
#UPDATE | Patra Chawl land scam case: Mumbai’s PMLA court grants bail to Shiv Sena leader & MP Sanjay Raut https://t.co/upyL10h3pR
— ANI (@ANI) November 9, 2022
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. जामिनासंदर्भातील याचिकेवरील आदेश 9 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला होता. न्यायालयाच्या दिवाळी सुट्टीपूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी युक्तिवाद केला होता आणि लेखी म्हणणे मांडण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार विशेष सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यापुढे ईडीच्या वतीने ऍड. आशीष चव्हाण यांनी लेखी म्हणणे सादर केले, तर संजय राऊत यांच्या वतीने ऍड. विक्रांत साबणे यांनी बाजू मांडली.































































